६ जण अटकेत; पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई
नगरदेवळा – येथून जवळच असलेल्या संगमेश्वर येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्यावर नगरदेवळा दुरक्षेत्राच्या पोलिसांनी छापा टाकून ६ जण ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने छापा टाकून कार्यवाही केली होती. त्याबाबत सर्वत्र वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रासारीत होताच नगरदेवळा पोलिसांना उशिरा का होईना जाग आल्याने त्यांनी सर्वत्र अवैध धंद्यांवर धडसत्र सुरू केले आहे.
काल झालेल्या कार्यवाहीत रतन चिंधा पाटील, संजय जगन पाटील, ललित रमेश पाटील, आनंदा दाभाडे, प्रमोद पाटील व मालक विजय सुधाकर पाटील यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील, नरेंद्र विसपुते, मनोहर पाटील, हिरालाल पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश पाटील करीत आहेत.
कारवाईच्या धास्तीने अड्डे बंद
अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अवैध्य धंद्यांवर धडक कारवाई सुरु करताच त्यानंतर स्थानिक पोलिसांनीही जुगार अड्ड्यांवर धडसत्र सुरु केले आहे. त्यामुळे बारमाही चालणारे अनेक जुगार अड्डे हे मात्र बंद राहिले आहेत. तथापि, कांहीजणांनी जागा बदलल्याची चर्चा सुरु आहे.