६ जणांवर गुन्हा दाखल
नगरदेवळा – पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यावरुन त्यांच्या पथकाने नगरदेवळा नदीपात्रात जुगार, सट्टा अड्ड्यावर छापा टाकुन ६ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन २६ हजार ९९० रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने हस्तगत करुन त्यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात सर्वत्र अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू आहे. अवैध धंद्यांचं माहेरघर बनलेल्या नगरदेवळा गावी सट्टा, जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यावरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नगरदेवळा येथील अगणावंती नदीपात्रातील कल्याण मटका, जुगार अड्यावर पो उ नि विजय साठे, पोलीस नाईक शंकर जंजाळे, पो कॉ प्रभाकर पाटील, भगवान पाटील या पथकाने छापा मारुन ३ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याजवळुन २६ हजार ९९० रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने हस्तगत करुन दिनेश राऊळ, विक्रम गढरी, भीमसिंग राजपूत, राजेंद्र चेडे, रवींद्र भोई, अशोक कोळी सर्व रा नगरदेवळा यांच्या विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील करीत आहेत.