नगरदेवळा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा

0

नगरदेवळा । जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूक 2017 यासाठी नगरदेवळा येथे पाटील मंगल कार्यालयात झालेल्या गटाच्या मेळाव्यात तालुक्याचे माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील अध्यक्ष स्थानी होते. तसेच आमदार किशोर पाटील, जि.प.सदस्य उध्दव मराठे, मीनाताई पाटील, दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगरसेवक गणेश पाटील, पं.स. सभापती सुनीता सोमवंशी, अंबादास सोमवंशी आदिची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. त्यांनी नगरदेवळा गावसह गटात केलेल्या विकास कामांची यादी जनतेसमोर वाचून दाखवली. विरोधकांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत कोट्यावधी रुपयांची कामे करून जर यांना दिसत नसतील तर विरोधक झोपेचं सोंग घेतल्याची टीका रावसाहेब पाटील यांनी केली.

आमदारांनी विरोधकांवर डागली शिवसेनेची तोफ
नगरदेवळा-बाळद गट ज्यांनी कुडघोरीचे राजकारण करून मागासलेल्या परीस्थितीत आणुन ठेवला होता. त्यातुन नवीन दिशेने व आशेने कामाला लागुन विकासकामांची गंगा आणली आणि गटाला विकासाकडे नेण्याचे काम आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आमदार पाटील म्हणाले की, नोटबंदीने शेतकरींना रस्त्यावर आणले. गुल्फीचे आमीश दाखवुन भोळी भाबडी जनतेला हातात फक्त बॅकेचे काही महिन्यांचे व्याज म्हणजेच 200 ते 250 रुपयांचे व्याज माफ करून चॉकलेट देण्याचे काम करून धोका देण्याच्या प्रयत्न केला. नगरदेवळा-बाळद गटात आमदार व जिल्हा परिषद फंडातून 30 कोटींची विकास कामे करून दाखवुन पाचोरा तालुक्यात विकासाचे आदर्श पॅटर्न म्हणुन ओळख देण्याचे काम रावसाहेब पाटील यांनी करून दाखवले. आता जि.प.साठी हेच एक सुशिक्षित सक्षम उमेदवार असुन व इतर जे दोन पं.स चे उमेदवार शिवसेना देणार आहेत त्यांना प्रचंड मतांनी निवडुन देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. विकासाची गंगा अशीच गटात येत राहील.

नगरदवेळा कार्यकर्ता मेळाव्यात यांची होती उपस्थिती
कार्यकर्ता मेळाव्यात दिनकर बाप्पू देवरे, कृष्णा सोनार, अविनाश आबा कुडे, यांनीही मनोगत व्यक्त केली. त्यावेळी पं.स. सदस्य सुधाकर महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख हर्षजित पवार, सरपंच सुनंदा पाटील, नामदेव पाटील, माजी सरपंच अरुण काटकर, प्रकाश परदेशी, कृष्णा सोनार, सर्व ग्राम पंचायत सदस्य, विनोद राऊळ, श्याम शिंपी सर, सुरेश चौधरी, सुधाकर ठाकूर,भैया महाजन, सागर पाटील, पांडुरंग भामरे, दिलीप परदेशी, बाळू नाना काटकर, वसंत जिभू पाटील, उज्जेन दादा राजपूत, राहुल राजपूत, राजू पाटील होळ, अन्नू शेख, अंबादास सोमवंशी मयूर पवार, शरीफ खाटीक, जिब्राईल शेख, रोहिदास पाटील, संजय कुंभार, निंबा बाप्पू, अनिल पाटील, सुनील शिंपी, बंडू राजपूत, रमेश गायके, सुनील कदम, भीमराव पाटील, नाना वाणे, चंद्रकांत सोमवंशी, सोनाराम बाप्पू, मोतीलाल आबा, भोमा नाना, शिवदास तात्या, सुभाष आबा, सुभाष कोकंदे , बाबा काका, धर्मराज पाटील, आनंद पाटील, शंतनू पाटील, महारु तात्या, छोटू निकुंभ, किरण पाटील, निंबा गढरी, आबा निकम, सरदार परदेशी, विठ्ठल अप्पा दिघी, प्रकाश बाप्पू, श्रावण तात्या शाम भाऊ शालीक महाराज भोरटेक, धनसिंग गढरी, काबा अण्णा, सुरेश मूळमुळे, करण नाना, नगरदेवळा बाळद गटातील सर्व सरपंच, त्यांचे सदस्य, शिवसेना -युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.