नगरदेवळा शिवारात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त,६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

पाचोरा (प्रतिनिधी): देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र थैमान घातलेले असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २२ मार्च पासून देशात लोकडॉउन असून सर्वत्र दारूची दुकाने बंद असल्याकारणाने मदयपींची मात्र तारांबळ उडताना दिसून आली आहे. दारू कुठेही मिळत नसल्यामुळे या काळात गावठी दारूची मागणी मात्र मोठया प्रमाणावर वाढली आहे व गावठी दारूचा हैदोस मोठ्या प्रमाणावर होत असताना आज दि.२८ एप्रिल २०२० रोजी उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्या कडे गोपनीय माहितीच्या आधारावर दारूबंदी अधिकारी व्ही.एम.माळी, रवींद्र जंजाळे यांच्या पथकाने नगरदेवळा शिवारामध्ये अग्नावती धरणाकाठी जावून दारूच्या हातभटया उध्वस्त केल्या आहेत. यामध्ये १२७० लिटर रसायन तसेच ४५ लिटर गावठी हातभट्टी दारू व एक मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८ ए.ई ९५२६ क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स गाडी जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ३ बेवारस गुन्हे व १ वारस असे एकूण ४ गुन्हे दाखल करून २ आरोपींवर कारवाई केली आहे.