नगरदेवळा होणार चकाचक; कचरामुक्त गाव करण्याचा निर्धार

0

नगरदेवळा। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरदेवळा चकाचक करण्यासाठी औरंगाबाद येथिल सिआरटी हि संस्था सरसावली असून सुरेश घोरपडे, अमोल दाभाडे ह्या दोन प्रतिनिधींनी बुधवार 10 एप्रिल रोजी गावाची पाहणी करून ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊन प्राथमिक माहिती दिली. संस्थेचा उद्देश व उद्दीष्ट आवडल्याने गाव कचरा मुक्क व चकाचक करण्याचा निर्धार आज ग्रामसचिवालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. आपली सिटी टकाटक मोहीमेत सिआरटी संस्थेने औरंगाबाद, वाळंज व सिडको येथे लक्षणीय काम केल्याने लवकरच नगरदेवळा गाव चकाचक व कचरामुक्त होण्याची हालचाल सुरु झाली आहे.

रिसायकलींग करून पुन्हा वापरासाठी तयारी
भारत मिशन अंतर्गत नगरदेवळा गावातील प्रत्येक वार्ड व प्रत्येक गटारींसह अग्नावती पात्रातिल सर्व तुंबळ स्थाने या मिशन अंतर्गत स्वच्छ करण्यात येणार असून त्या कालखंडात जमा होणार्या संपूर्ण घनकचर्‍याचेही रिसायकलींग पद्धत वापरून ओल्या कचर्यापासून कंपोष्ट खत, तर सुका कचरा म्हणजे ज्या प्लॅस्टीक बॅगा, पृष्ट आदी सरळ सुका कचरा जमा करून पुन्हा वापरात येण्यासाठी कंपनीत पाठवला जाणार आहे. या प्राथमिक पाहणीनंतर संस्थेतर्फे लवकरच पंचायतीच्या कर्मचार्‍यांसह स्वयंसेवी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून दोन महिन्यात संपूर्ण गाव स्वच्छ व चकाचक करण्यात येणार आहे. बैठकीत सरपंच सुनदा नामदेव पाटील, गाविअ राठोड, माजी सरपंच अरूण काटकर, कृष्णा सोनार, अविनाश कुडे, नामदेव पाटील, सागर पाटील, संदिप महाजन, कन्हैय्या परदेशी, प्रकाश परदेशी आदिसह ग्राप सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.