शिंदखेडा। येथील नगरपंचायतीचे अभियंता ईश्वर दादाजी सोनवणे यांना विजयसिंग नथेसिंग राजपुत यांनी धक्काबुक्की करून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या कारणाने मुख्याधिकारी अजित निकत सह सर्व न.प. कर्मचार्यानी विजयसिंग राजपूत यांचा विरोधात शिंदखेडा पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.
सविस्तर वृत असे की, शिंदखेडा नगरपंचायत हद्दीत शासकीय काम चालू असतांना रस्त्यावर खड़ी टाकण्याचा शुल्लक कारणावरून दि.19 सायं. 5 वाजता नगरपंचायत कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. व त्या नंतर अभियंता ईश्वर सोनवणे यांना शिवीगाळ करून अंगावर धावून आले व शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. सदरची घटना ही अत्यंत खेदजनक असून शासकीय कामकाजात अडथळा आणणारी आहे. सदर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो अशा बाबतीत योग्य तो न्याय मिळावा या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे.