समाजकंटकांचे कृत्य असल्याचा प्रशासनाचा संशय
आळंदी : येथील नगरपरिषदेचा कचरा डेपोला दुसर्या वेळेस पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून झाल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. आळंदी संस्थानने नगरपरिषदेला घनकचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाच एकर जागा कराराने दिली आहे. या जागेत कचर्यावर कंपोस्टिंग करण्याचे काम येथे सुरु आहे. येथील कामगार, तसेच सुरक्षारक्षक जवळ राहतात. अचानक कचर्याचे परिसरातून रात्री धुर दिसल्याने येथील रक्षक, कामगार यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनास कळवून अग्निशमन यंत्रणेस पाचारण केले. यावेळी विजय पवार यांनी तात्काळ अग्निशमन वाहन नेत येथील कचरा पेटविलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करून कचर्याचे ढिगार्यावर फवारणी करून रात्री उशिरा आग वीजविल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा
दुसर्यांदा घडली घटना
कचरा डेपोला आग लागल्याचे धुरामुळे कळल्याने कामगार व सुरक्षारक्षक धुराच्या दिशेने आले. त्यावेळी त्यांना आग लावून पळून जाताना काहीजण दिसल्याचे आळंदी नगरपरिषद प्रशासनास त्यांनी सांगितले. कचरा डेपो पेटविला जाण्याचे प्रकारची घटना दुसर्यांदा झाली आहे. यापूर्वी एकदा असा प्रकार घडला होता. यावेळी यंत्रणेसह आर्थिक नुकसान होते. नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर प्रकल्प व निविदा कामकाजा प्रमाणे येथे कामे सुरु झाली आहेत. येथील कामांचे उद्घाटन होणार होते. डेपोतील कचरा पेटवून देण्याची ही दुसरी वेळ आहे. या अगोदर एकदा कचरा डेपोला आग लावण्यात आली होती. या प्रकरणी नगरपरिषद गुन्हा दाखल करणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.