चाळीसगाव विविध संघटना पदाधिकाऱ्यांचे निवेदन : बंजारा समाजाला खुला भूखंड मिळावा
चाळीसगाव- नगरपालिका हद्दीतील पवार वाडी येथील गट नंबर 323/2 यामधील खुल्ला भूखंड बंजारा समाजास सांस्कृतिक उपक्रमासाठी सदरचा भूखंड तात्काळ समाजास हस्तांतर करण्यात यावे. तसेच यावा त्याचप्रमाणे चाळीसगाव नगरपरिषद इमारतीला संत सेवालाल महाराज तर नगरपरिषद सभागृहाला के के मुस यांचे नाव देण्यात यावे यासंदर्भात चे बंजारा क्रांती दलाच्या वतीने विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांना देण्यात आले.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर (युवा आघाडी सचिव) संदीप भाऊ राठोड, अडवोकेट भरत चव्हाण (शेतकरी बचाव कृती समिती), भिमराव जाधव (बंजारा चळवळ), गंगाराम राठोड (बीबी के डी) योगेश राठोड (बहुजन मुक्ती पार्टी), सुभाष राठोड, शुभम राठोड, अशोक राठोड (ग्लोबल फाउंडेशन), रमेश राठोड, श्रावण राठोड, राहूल राठोड(युवा संघटक), शुभम राठोड, विलास जाधव, गोटीराम भाऊ, विजय भाऊ, भाऊलाल सोनार, मंगलचंद सोनार, शुभम चंद भाऊ आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.