नंदुरबार/नवापूर/शहादा । अत्यंत चुरशीच्या व मातब्बर नेत्यांसाठी प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकनिवडणुकीसाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी उशीरापर्यंत 72 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. नवापूरातही शांतते मतदान पार पडले. येथेही सायंकाळी उशीरापर्यंत 66.33 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला मतदान केंद्रांवर अल्पप्रतिसाद मिळाला, दुपारी 1 वाजे नंतर मतदारांचा उत्साह दिसून आला. दुपारी 3 वाजेनंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान सुरू राहिले,नगराध्यक्षपदाचे 6 उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या 39 जागांसाठी 113 उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद झाले आहे. नवापूरात सायंकाळी अचानक मतदानाची गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, तळोदा पालिकेसह 18 डिसेंबर चारही पालिकांची मतमोजणी होणार असून आता सर्वांना 18 डिसेंबरची उत्सुकता लागली आहे.
गोंधळ, किरकोळ हाणामारी
मतदान सुरळीत होत असतांना प्रभाग क्र. 8 मध्ये खासदार हीना गावीत आल्या असता मतदान करण्यावरून काँग्रेसच्या उमेदवारचे नातेवाईकांची आणि खासदार गावीतांची शाब्दिक चकमक झाली. तर सायंकाळी प्रभाग क्र. 14 मध्ये माळीवाडयात काँग्रेस उमेदवाराचे पती व भाजपा उमेदवाराचा मुलगा यांच्यात किरकोळ वादावरून हाणामारी झाली. घटनेची माहती मिळताच त्वरित पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस अधक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर हा वाद सामाज्यस्याने मीटवण्यात आला.
भाजप, काँग्रेस खरी लढत
लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी खरी लढत भाजपा आणि रीपाई युतीचे उमेदवार प्रा.डॉ. रविंद्र चौधरी आणि काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवार सौ,रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्यात आहे. नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवकपदाच्या 39 जागांसाठी 113 उमेदवार रिंगणात आहेत. 126 बुथमध्ये मतदान झाले.सकाळी 7.30 ते 8.30 वाजे पर्यंत 4 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 वाजे पर्यंत 51.16 टक्के मतदान झाले होते. तीन वाजे नंतर मतदानासाठी मतदारांनी रुची दाखवल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत मतदारांच्या रांगा मतदान केंद्रात होत्या. सिंधी कॉलनी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे चित्र दिसून आले.
नवापुरातील स्थिती अशी
नवापूर नगर पालिकेचे मतदान आज किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडल.े सकाळी लोक मतदानासाठी बाहेर निघतच नव्हते दुपारी प्रभाग 7 व 2 येथे मतदान केंद्राबाहेर किरकोळ वाद झाला पोलीस आल्यावर तो मिटला. दुपारी 3 वाजे नंतर मतदानासाठी लोक बाहेर पडले. नवापूर शहरात 28 हजार 791 एकूण मतदारांची संख्या त्यातुन सकाळी साडे सात पासून ते साडे नऊ पर्यंत दोन तासात 4.4 टक्केवारी मतदान झाले होते. दुपारी 12 वाजेला 25 टक्के होऊन साडे तीन वाजेला 35 टक्के मतदान झाले होते. सर्वच प्रभागात काँटे की टक्कर लढत झाली असून कोण जिंकेल याची नवापूरकरांना उत्सुकता लागून आहे.
मतदान करताना गोंधळ
विशेष म्हणजे मतदारांना मतदान केंद्रावर किती वेळा बटन दाबावे याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. मतदान अधिकारी यांनी तीन वेळा मतदान केल्याचे सांगत तिसरे बटन दाबल्यावर आवाज येतो तेव्हा मतदान होते असे मार्गदर्शन करत होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अचानक गर्दी वाढल्याने काही काळ गोंधळ झाला होता. लांबच लांब लाईन पाहून अनेकांनी माघारी परत फिरणे पसंत केल्याचे दिसत होते. कर्मचार्यांचाहा मार्गदर्शनामुळे बराच वेळ गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
निकालाची उत्सुकता
13 रोजी मतदान झाल्यानंतर 14 रोजी मतमोजणी होणार होती, परंतु तळोदा नगरपालीका निवडणुक 3 दिवस पुढे ढकलली गेल्याने तळोदा, नंदुरबार , नवापूर आणि सिंधखेडा येथील मतमोजणी 18 रोजी होणार आहे. नंदुरबार न.पा.निवडणुकची मतमोजणी खामगावरोडवरील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात होणार आहे.त्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे.
शहाद्यात पोटनिवडणूक
शहादा । येथील 3 ब मधे पोटनिवडणुकीसाठी 63.50 टक्के मतदान झाले. सकाळपासुन अगदी शांततेत मतदान सुरु झाले सकाळी अकरा वाजेपर्यंत थोड्या उत्साहात मतदार घराबाहेर पडले होते. नंतर मतदरांचा उत्साह कमी झाला होता अधुन मधुन मतदार मतदानासाठी येत होते . दोघ उमेदवार व कार्यकर्ते मतदाराना बाहेर काढुन मतदानासाठी प्रोत्साहीत करत होते . दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकुण 1618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 933 पुरुष मतदार तर 685 महिला मतदारानी मतदानाचा हक्क बजावला होता . दुपारी साडे तीन वाजे पर्यंत 57 टक्के एवढे मतदान झाले. सायंकाळी 5.30 वाजता एकुण 63.50टक्के एवढे मतदान नोंदविण्यात आले. त्यात 1034 पुरुष तर 753 महिला मतदारांनी मतदान केले.