जळगाव । मनसेचे नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी शिव जयंतीच्या दिवशी महिलांशी अरेरावी करुन शिवीगाळ केली तसेच महापुरूषांबद्दल अपशब्द वापरले म्हणून भाजपा महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी बंटी जोशी यांच्याविरुध्द चौकशी व्हावी यासाठी सोमवारी 20 रोजी पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेवून चौकशीसाठीचे निवेदन दिले. तसेच भाजपा महिला पदाधिकार्यांनी रामानंद नगर पोलिसांना देखील याबाबतचे निवदेन दिले आहे.
काही मुलींच्या दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या
बंटी जोशी यांनी दारू पिउन येवून भाजपाला शिव्या द्या व त्यांचे पथनाटय करा. यानंतर सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान गोंधळ घातला. यावेळी काही मुलींच्या दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या व दाखवा माझे काय करुन घेता असे निवेदनात म्हटले आहे.
यांची होती उपस्थिती
महानगराध्यक्षा जयश्री पाटील, मंडळ अध्यक्षा जयश्री नागराज पाटील जिल्हा चिटणीस वंदना पाटील, नम्रता जोशी आदी उपस्थित होते त्यांनी त्यास विरोध केला.या प्रकाराबाबत जयश्री पाटील यांना पोलीस अधिक्षकांना बंटी जोशी याने शिवाजी महाराजां बद्दल व भाजपा बद्दल अपशब्द वापरुन शिवीगाळ केली. याची सखोल चौकशी व्हावी याचे निवेदन दिले आहे. यावर जयश्री पाटील, शोभा कुलकणी,जयश्री नागराज पाटील, ममता जोशी, ज्योती पालीवाल, रेखा पाटील,छाया पाटील,आदींच्या स्वाक्षरी आहेत.
जोशींनी आरोप फेटाळले
अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपा महिला आघाडीने कलेले आरोप फेटाळले आहेत. मी दारू पिवून अपशब्द वापरले असते तर लोकांनी मला तेथेच मारले असते.दुपारी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्र प्रदर्शनाला मी प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजुमामा भोळे यांच्यासोबत उपस्थित होतो.काव्यरत्नावली चौकात पथनाटयाचा शेवट होता तेथे मी थांबलो हा कार्यक्रम भाजपाचा आहे, असे त्यांनी सांगितले.