नगरसेवक चंद्रकांत नगराळेंचे विधायक काम

0

नवापूर । गेल्या पंचवार्षिक नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांग 1 (सध्या प्रभाग क्र 2) मध्ये निवडुन आलेले नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी निवडणुकीत आपल्या प्रभागातील मतदारांना दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता त्यांनी आपल्या प्रभाग क्र 1मध्ये केलेल्या विकास कामावरुन दिसुन आली आहे. दैनिक जनशक्तीने प्रभाग क्र 1मधुन विकास कामाचा मागोवा घेतला. भटकंती केली असता गेल्या पाच वर्षात येथे विविध विकास कामे झाली आहेत असे निदर्शना आले आहे. विशेष म्हणजे नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी कामांचा सतत पाठपुरावा करुन सर्वाॉधिक कामे आपल्या प्रभागात केल्याचे प्रकर्षाने जाणवते.

सुंदरता वाढविणार मुख्य रस्ता
सर्वात प्रथम या प्रभागात नाना नानी पार्कचे सर्वात मोठे काम झाले आहे तसेच शहराचे सुंदरता वाढवणार दुतर्फा कॉलेज रोड व प्रवेशद्वार पयर्ंतचा मुख्य रस्ता झाला आहे. रस्ते गटारी या बरोबरच लालबारी व तिनटेंभा या गरीब आदिवासी भागात पाण्याचा खुप मोठा प्रश्‍न होता येथे पाणी पुरवठा योजना मंजुर करुन ते काम सुरु करण्यात आले आहे. सुशिक्षितवर्ग व काही भागात मध्यम व गरिब वर्ग अशी मिश्र लोकांची वस्ती या प्रभागात आहे. मागे कामे व्हायला पाहिजे ती झाली नाही ही खंत या भागातील लोकांना आहे. मात्र ती विकास कामे या पाच वर्षात नगरसेवक नगराळे यांनी नगर पालिकेचा माध्यमातुन केल्याचे मतदार सांगतात.

रस्ते, पाणी, आरोग्य, मनोरंजनासाठी नाना नानी पार्क अशी चौफेर विकास कामे माझा प्रभाग क्र 2 मध्ये झाली आहेत. अनेक प्रश्‍न व समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. जी कामे सांगितली ती केली आहेत,काही बाकी राहीली ही असतील पण प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. या प्रभागातील विकास कामांचा जोरावर या निवडणुकीत आपण पुन्हा जनते समोर जाऊन पुन्हा निवडुन येऊ.
– चंद्रकांत नगराळे,, नगरसेवक