नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यातर्फे फवारणी

0

जळगाव- कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रभाग 08 मध्ये नगसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी स्व:खर्चांने सोडियम हायपो क्लोराइडची फवारणी करुन परिसर निर्जंतुक केले आहे. प्रभाग 08 मधील टिळक नगर,रामद्वार पार्क,कृष्णपुरम,चाळीस खोल्या,आनंद कॉलनी, साई मंदिर परिसर,अग्रवाल प्रोव्हिजन परिसर,दादावाडी मंदिर परिसर,गजानन पार्क,संत गुलाब बाबा दरबार परिसर,दिव्या पार्क,कल्याणी नगर,फेडरेशन कॉलनी,स्वामी समर्थ मंदिर परिसर,या ठिकाणी फवारणी करण्यात आली.संपूर्ण प्रभागात येत्या 2 दिवसात फवारणी करण्यात येईल.

तसेच ज्या ठिकाणी फवारणी वाहन पोहचत नाही त्या ठिकाणी छोट्या वाहनाने फवारणी करण्यात येणार आहे.या साठी श्रीराम नगर तरुण मित्र मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. तसेच कोरोना संदर्भात संपूर्ण प्रभागात ऑडिओ क्लिप व्दारे रिक्षा फिरून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना कोरोना संसर्गजन्य विषाणू च्या प्रादुर्भाव पासून बचावासाठी घरीच राहा…सुरक्षित राहा…काळजी घ्या असे आवाहन नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.