नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ आता आमदार व्हावेत

0

‘आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांची भावना

रावेत : ‘बाळासाहेब ओव्हाळ आपल्यावर जनतेचे असणारे प्रेम हे आजच्या उपस्थितांवरून लक्षात येत आहे. या सर्वसामान्य नागरिकांची आणि आंबेडकर प्रेमींची एकच इच्छा आहे, की तुम्ही पिंपरी विधानसभेतून येणार्‍या निवडणुकीत प्रतिनिधित्व करावे व शहराचा आरपीआय आठवले गटाचा प्रथम आमदार बनण्याचा मान मिळवावा, असे प्रतिपादन आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांनी केले. नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर शैलजा मोरे होत्या.

जनता मंत्रालयात पाठविणार
भागवत म्हणाले, आपल्या परिवाराचा राजकीय पिंड अथवा राजकीय पार्श्‍वभूमी नसताना ही आपण प्रथमच महापालिकेची निवडणूक लढलात आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आलात हा विजय म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय आहे. हे सातत्य पुढे चाली ठेवण्यासाठी तुम्ही आता महापालिका क्षेत्र सोडून राज्याच्या मंत्रालयात जावे, असे सर्व नागरिकांची इच्छा आहे. आजच्या जनमुद्यावरून हे लक्षात येते की तुम्ही भविष्यात शहराचे आमदार म्हणून नेतृत्व करणार यात शंका नाही.

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ओव्हाळ मित्र परिवार, आरपीआयचे सर्व पदाधिकारी ,शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने किवळे येथे मुकाई चौक ते किवळे गावठाण पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरात होत असलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुळवेळाचे वाटप करण्यात आले. किवळे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे उदघाटन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या विद्यार्थी, महिला, नागरिक, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक आदींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांची हिंदी मराठी सुगम गीतांच्या संगीत रजनीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी ब प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक सचिन चिंचवडे, विकास डोळस, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, शिवसेना नेते बाळासाहेब वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी भोंडवे, नंदूशेठ तरस, भाजपा महिला आघाडी प्रमुख अनिता सोनवणे, नेरेचे उपसरपंच विदूर जाधव, विलास चव्हाण, भाजप कोअर कमिटी सदस्य हेमंत ननवरे, आरपीआय चे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुख्तर, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, सरचिटणीस बाबा सरोदे, कोषाध्यक्ष गौतम गायकवाड, युवक आघाडी उपाध्यक्ष अजय झुंबरे, मुस्लिम आघाडी प्रमुख शकुरभाई शेख, विकास नगर अध्यक्ष सुनील कडलक, दयानंद वाघमारे, लिंबराज कांबळे, संजीवन कांबळे, शरद जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपा कोअर कमिटी सदस्य बिभीषण चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन आदेश नवले यांनी केले. उपस्थितांचे आभार नेरेचे माजी उपसरपंच साहेबराव जाधव यांनी मानले सोहळ्याचे आयोजन युवा उद्योजक रोहित ओव्हाळ व मित्र परिवाराने केले होते.