भुसावळ: सध्या जगभर कोरोनाचे थैमान घातले आहे. भारतात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र समाजातील दान-शूर मदतीसाठी पुढे सरसावले आहे. त्यात भुसावळ येथील नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांनी वॉर्ड क्रमांक 16 शनी मंदिर येथे जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप केले. तेल, सर्व प्रकारच्या डाळी, पीठ, साखर, मीठ, चहा पावडर, तूप, साबण, मसाला आदी जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. संतोष(दाढी) चौधरी यांच्यासह प्रकाश चौधरी, शंकर चौधरी, सुरेश चौधरी, भूषण चौधरी, महेश चौधरी, योगेश चौधरी, जय चौधरी व कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.