शहादा । येथील नगरसेविका रिमा पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत अवयदान करण्याचा संकल्प केला. गेल्या आठवड्यात जायन्ट्स ग्रुप ऑफ शहादा व जायन्ट्स सहेलीयांच्यातर्फे अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका रिमा पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून अवदानाचा संकल्प केला.
कुटंंबाचेही भरले अर्ज
जनजागृती हे अभियान कृतीतून पूर्ण करण्यासाठी नगरसेविका-रिमा विनायक पवार यांनी वाढदिवस निमित्त स्वतः व त्यांचा कुटुंबियांचा अवयवदानाचा अर्ज भरून घेतला. रिमा पवार यांच्या 24 वा वाढदिवस म्हणून एकूण 24 व्यक्ति नी फॉर्म भरले त्यात त्यांचा सम्पूर्ण परिवार व जायन्ट्स ग्रूप चे काहीे सभासद संजय सोनार, ऋतूराज सूराना, स्विटि सूराना, सोबतच भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्ता कल्पना पंड्या व त्यांचे पती रविंद्र पंड्या यांनी देखील अर्ज भरून घेतले. वरील उपक्रम हा जायन्ट्सच्या संयोजनाने सुश्रुत नर्सिग होम येथे डॉ. बी. डी. पटेल यांचा हस्ते रीमा पवार व त्यांचा संपुर्ण परिवाराने अवयवदानाचा अर्ज भरला.