अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावर जातेगांव घाटात आज गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रक कारला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहे. दोन्हीही श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत. मृतापैकी एक जण पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ आहे.
गुरुवारची रात्र अपघाताची मालिका ठरली. कारण रात्री १ वाजेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर कंटेनरची लक्झरी बसला धडक बसल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. तर या अपघातस्थळापासून १०० मीटर अंतरावरच आजक सकाळी टेम्पो पलटी होऊन एकजण किरकोळ जखमी झाला आहे.