नगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजने पटकावले पुरुषोत्तम करंडकाचे विजेतेपद

0

‘एसएल प्लीज’ व ‘सॉरी परांजपे’ एकांकिकांनीही मारली बाजी

पुणे । यंदाचा पुरुषोत्तम करंडक नगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजच्या ‘माईक’ या एकांकिकेने पटकावला. तर द्वितीय क्रमांकाचे हरी विनायक करंडक पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘एसएल प्लीज’ या एकांकिकेने पटकावले तर तृतीय क्रमांकासह संजीव करंडकावर बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेला मिळाला.

नऊ एकांकिकांचे सादरीकरण
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारपासून (९ सप्टेंबर) भरत नाट्या मंदिर येथे सुरू झाली. नऊ एकांकिकांच्या सादरीकरणानंतर रविवारी रात्री अंतिम फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला.

समर नखाते, अमिता खोपकर आणि मिलिंद फाटक यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. भरत नाट्य मंदिर येथे शुक्रवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

अंतिम फेरीचा निकाल याप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट अभिनय :
अभिनेता –
आदित्य कुलकर्णी (आभास-एएसएल प्लीज-मॉडर्न महाविद्यालय), नाथ प्रसाद पुरंदरे (आदित्य मुजूमदार-भूमिका- स.प. महाविद्यालय), गंधर्व गुळवेकर (प्रज्योत-सॉरी परांजपे-बीएमसीसी),
अभिनेत्री – समृद्धी देशपांडे (मॉरगॉट-आफ्टर द डायरी-आबासाहेब गरवारे महाविद्यालय),
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ऋषी मनोहर (सॉरी परांजपे-बीएमसीसी),
दिग्दर्शन – उत्तेजनार्थ – कृष्णा वाळके (माईक- न्यू आर्ट्स कॉलेज), सूरज गडगिळे (आफ्टर द डायरी- आबासाहेब गरवारे महाविद्यालय), अभिनय – उत्तेजनार्थ – प्राची रोकडे (माया-एएसएल प्लीज-मॉडर्न महाविद्यालय), विराज अवचित्ते (भय्या) आणि कृष्णा वाळके (बज्या-माईक-न्यू आर्ट्स), पार्थ वाईकर (विश्‍वनाथ साने-साने आणि कंपनी-काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), शुभम कुलकर्णी (गणेश-मुकुंद कुणी हा पाहिला-गरवारे वाणिज्य महाविद्यालय), हरीश बारस्कर (यशवंत-ड्रायव्हर-पेमराज सारडा महाविद्यालय, नगर), ओजस मराठे (सावरकर-भेट- फर्ग्युसन महाविद्यालय), चिन्मय पटवर्धन (चैतन्य प्रभू-भूमिका-स. प. महाविद्यालय), वैभवी चव्हाण (अ‍ॅन-आफ्टर द डायरी-आबासाहेब गरवारे महविद्यालय), ऋचा भाटवडेकर (सुलोचना साने-साने आणि कंपनी-काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिका – जान्हवी चावरे (इन बिटवीन-सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय),
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक – रत्नदीप शिंदे आणि सूरज गडगिळे (आफ्टर द डायरी-आबासाहेब गरवारे महाविद्यालय),
उत्तेजनार्थ विद्यार्थिनी लेखिका- पूर्वा राजज्ञा आणि भावना झाडे (साकव-कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय),
सवरेत्कृष्ट आयोजित संघ (भालचंद्र मानचिन्ह) – कोंडी (विश्‍वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)