जळगाव । गांधी उद्यान पुनर्निर्माण भूमीपुजन महाराष्ट्र दिन 1 मे रोजी पार पडला. महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त जीवन सोनवणे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन या यांच्याहस्ते औपचारिक पूजा करून, मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून झाले. काव्यरत्नावली चौकात अबाल वृद्धांसाठी अद्ययावत असे भाऊंचे उद्यान साकारले त्याच प्रमाणे शहरातील मध्यभागी असलेल्या गांधी उद्यानाचे देखील पुनर्निर्माण होत आहे. या उद्यानाचे काम 30 जून पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. भाऊच्या उद्यानानंतर गांधी बागीच्याचे पुननिर्माण करण्यात येत आहे.
जैन उद्योगसमूहातर्फे दुसरे उद्यान विकसित
भाऊच्या उद्यानांतर साहित्यांनी सुशोभिषीत असे हे दुसरे उद्यान विकसित होणार आहे. हे उद्यानाचे पुनर्निर्माण 30 जून पर्यंत करण्यात येणार आहे. शहरातील महापालिकेच्या उद्यानांमध्ये साहित्य नसल्याने मुलांना उद्यानात खेळता येत नव्हते. मात्र, जैन उद्योग समुहाने भाऊंच उद्यान विकसित केले आहे. त्याच प्रमाण शहरातील गांधी उद्यानाचा पुननर्मिण करण्यात येत असून यात विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
यांची होती उपस्थिती
गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि, तसेच भवरलाल अॅड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी मानून हे पुनर्निर्माण होत आहे. या सोहळ्यास महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती वषार्र् खडके, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, नगरसेवक अमर जैन, सुनील माळी, श्यामकांत सोनवणे, शरद तायडे, आर्टिटेक्ट शिरिष बर्वे, बांधकाम व्यावसायीक अनिस शाह, नगर अभियंता सुनील भोळे, फारुख शेख, उदय महाजन व सहकारी उपस्थित होते.