तर्हाडी। येथील जिल्हा परिषद शाळेत स्व. नथ्थु सोनजी भलकार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळशीराम भामरे होते. यावेळी माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, मुकेश परदेशी, कचरू अहिरे, मुकेश भलकार यांनी मनोगत व्यक्त केले. भलकार बाबा स्वतः शिकले नाहीत परंतु, त्यांच्या गावातील मुलांना शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने त्यांनी दोन एकर शेती जिल्हा परिषद शाळेला दान दिली असल्याचे आठवण मान्यवरांनी काढली.
भलकार बाबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उदय भलकार व संजय भलकार यांच्याहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजाराम सोनवणे, अशोक भामरे, सुनील पाकळे, प्रफुल डामरे, मल्हार भलकार(संचालक सतुगिरणी), रावसाहेब भलकार, शशिकांत कदम, प्रताप गिरासे, रविंद्र बोरसे, के.डी. अहिरे, नवल कोळी, नरेंद्र दुसाने, बालु सोनवणे, योगेश जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरूण सुर्यवंशी यांनी तर आभार मुख्याध्यापक गणेश पवार यांनी मानले.