नदीकाठी धोबी घाट बांधून देण्याची मागणी

0

धुळे । शहरातील मुस्लीम – धोबी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी नदीकाठी धोबी घाट बांधून देण्याची मागणी मुस्लीम- धोबी समाज सुधार संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनात म्हटले आहे की, नदीकाठी शिवाजी रोडलगत कालिका मंदिर ते शीतला माता मंदिरापर्यंत मुस्लीम-धोबी समाजातील सुमारे 100 ते 150 कुटुंबे कपडे धुण्याचे काम गेल्या 100 वर्षांपासून करत आहेत. या सर्व कुटुबांचा उदरनिर्वाह कपडे धुण्याच्या कामावरच होतो. ज्यावेळी शिवाजी रोडचे काम सुरु होते तेव्हा आ.अनिल गोटे यांनी धोबी समाजाला ओशासन दिले होते की, तुम्हाला त्याच जागेवर धोबीघाट बांधून दिला जाईल व या कामासाठी त्यांनी 10 लाख रुपयेही आपल्या निधीतून मंजूर केले होते. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करुन धोबीघाट बांधून देण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष पीर मोहंमद शेख वजीर धोबी(खलीफा) यांनी केली आहे.