मुक्ताईनगर शहरातील दुर्दैवी घटना
मुक्ताईनगर – धुळवडीनंतर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा पाय निसटल्याने नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना शहरात घडली. प्रशांत सुरेश चव्हाण (18) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. शुक्रवारी रंगपंचमीनिमित्त मित्र मंडळीसोबत त्याने धुळवडीचा आनंद घेतल्यानंतर सकाळी मुक्ताई घाटावर तो अंघोळीसाठी गेला असताना त्याचा नदीत पाय निसटल्याने बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो आरोग्य केंद्रातील चालक सुरेश चव्हाण यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली.