पिंपरी : नदीशी आपले नाते भावनिक असायला हवे. ही गोष्ट नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरू शकेल. नदीशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नदीला नदीपण द्या. वाढते औद्योगिकीकरण आणि रोज एक नवीन शहर तयार होत असताना विकासाच्या या प्रवासात नद्यांकडे दुर्लक्ष केलं.
ज्या नदया शुद्ध पाण्याचा पुरवठा करतात त्या जीवनदायिनी म्हणून ओळखल्या गेल्या किंवा त्या इतक्या प्रदूषित झाल्या की त्याच पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही, असे मत जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. जागतिक जलदिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संघटना, भावसार व्हिजन आणि पिंपरी-चिंचवड जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने नदी विषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.