मुंबई : मिठी, पोईनार आणि ओशिवरा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर नोटीसा पाठवून कडक कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. मंत्रालयात मिठी, पोईनार आणि ओशिवरा नदीतील प्रदूषणाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कदम म्हणाले, मिठी नदीतील कचऱ्यामुळे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यासाठी नद्यांमध्ये सांडपाणी सोडणारे, कचरा घाण टाकणारे, अनधिकृत झोपड्या उभ्या करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी. त्यांना नोटीसा द्याव्यात असे निर्देश प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. या आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, अधिकारी उपस्थित होते.