नफा मिळवून देण्यासाठी तरूणाची फसवणूक

0
सांगवी : हॉटेल व्यवसायात जास्तीचा नफा मिळून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 1 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत घडला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर फकीर सय्यद (रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण वेदप्रकाश मल्होत्रा (रा. कोरेगावपार्क, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्होत्रा याने एका वृत्तपत्रामध्ये हॉटेल व्यवसायात जास्त नफा मिळवून देण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली. ती जाहिरात वाचून फिर्यादी सय्यद यांनी आरोपीला फोन केला. आरोपीने त्यांना भेटून भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय करू असे सुचवले. सय्यद यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉटेल व्यवसाय न करता त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ए. ई. खटाळ तपास करीत आहेत.