नवी दिल्ली । भारत दौर्यावर असलेले पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी मोदींना प्रसिध्द फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावाची ’जर्सी’ भेट दिली आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशात सहा द्विपक्षीय करार झाले आहेत.
कोस्टा हे सात दिवस भारताच्या दौर्यावर आहेत. भेट दिलेल्या जर्सीवर रोनाल्डोची स्वाक्षरी आहे. याविषयी मोदी म्हणाले, पोर्तुगालमधील खेळाडू फुटबॉल चांगला खेळतात तर भारतात क्रीडाक्षेत्रामध्ये होणारा विकास हे दोन्ही देशामधील चांगली भागीदारी होऊ शकते. स्पेनचे क्लब रियाल माद्रिद आणि पोर्तुगालचे राष्ट्रीय संघाकडून खेळणारे रोनाल्डो राष्ट्रीय संघाचा कप्तान आहे. जगातील सर्वक्षेष्ठ खेळाडूचा बेलोन डिओर पुरस्कार चारवेळा जिंकला आहे.