नरेंद्र मोदी कॅप्टन, मी उत्तम बॅट्समन!

0
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा
शिक्षक-पदवीधर मतदारसंघात भाजपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
मुंबई :-  आगामी लोकसभा निवडणूक आम्ही पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार. ते आमच्या संघाचे कॅप्टन आहेत आणि मी चांगला बॅट्समन. त्यामुळे मॅच आम्हीच जिंकणार, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपा गेल्या ३० वर्षांपासूनचे मित्र आहेत. ते एकत्रच लढतील. तसे झाले नाही तर त्यांचे मोठे नुकसान होईल. आम्ही मात्र भाजपासोबतच राहणार, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा पाठिंबा आठवले यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केला.भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते मधु चव्हाण व अतुल शाह उपस्थित होते.
भाजपच्या उमेदवारांना दिला पाठींबा
मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार ॲड. अमित महेता, कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अॅड. निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिल देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिकेत पाटील यांना रिपाई (ए) चा पाठिंबा आहे. या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपाचे स्वागत
काश्मीर सरकारमधून बाहेर पडताना भाजपाने पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचा (पीडीपी) पाठिंबा काढल्याबद्दल आठवले यांनी भाजपाचे स्वागत केले. जम्मू आणि काश्मीर बारताचा अविभाज्य घटक आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरही भारताताच भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधींवर कारवाई करा
कोणत्याही पीडिताचे छायाचित्र प्रसिद्ध करणे हा कायद्याने गुन्हा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे छायाचित्र वापरले असेल तर त्यांनी ते ताबडतोब काढून टाकावे किंवा पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, असे आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.