नरेंद्र मोदी म्हणजे ‘कमांडर इन थीफ’- राहुल गांधी

0

नवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपात सुरू असलेलं वाक्-युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मोदींना ‘चोरांचा सरदार’ (कमांडर इन थीफ) म्हंटले आहे.

राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक व्हिडिओ ट्विट करत राफेल करारावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राफेल करारासंबंधी माहिती देत असल्याचं दिसतयं. राफेल करारासाठी भारत सरकारकडून अंबानीचं नाव सुचवण्यात आलं होतं. त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, असं माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांनी सांगितल्याचं हा व्यक्ती सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओखाली राहुल यांनी ‘भारताच्या कमांडर इन थीफ बाबतचं कटू सत्य’ असं लिहून मोदींवर निशाना साधला आहे.