नरेंद्र मोदी यांची साथ सोडल्याचा पश्चाताप नाही: राजू शेट्टी

0

मुंबई: २०१९च्या लोकसभेचे निकाल लागले असून त्यात अनेकांना धक्का बसेल असे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत राज्यात अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे. नांदेड मधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे, माढ्यातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, तसेच हातकणंगले मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पराभव झाला आहे.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेचे धनंजय माने हे मैदानात उतरले होते. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राज्यात भाजपा कडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आला. तसेच नरेंद्र मोदी यांची  साथ सोडली याचा  पश्चाताप नाही.  या पुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे असे सांगितले. माझा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात ८ ते ९ ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला आहे असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा ९६ हजार ३९ या मताधिक्याने पराभव केला. धैर्यशील माने यांना ५,८५,७७६ मते पडली तर राजू शेट्टी यांना ४,८९,७३७ मते पडली. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.