भुसावळ- नाहाटा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रशांत विजय पाटील यांची नरेंद्र मोदी विचार मंचच्या भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात चाली. तालुकाध्यक्ष नारायण कोळी यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मंचच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत तसेच समाजात सामाजिक जागरुकता, तसेच सार्वजनिक सेवा सुविधा उपेक्षितांपर्यंत पोहचविण्याचे कमी काम करणे हा या मंचाचा उद्देश आहे. प्रा.पाटील यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.