भुसावळ- तालुक्यातील साकरी येथे नरेंद्र मोदी विचारमंचचे तालुकाध्यक्ष नारायण कोळी, राहुल महाजन व मित्र परीवारातर्फे जिल्हा परीषद शाळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणार्यांचा रोख पारीतोषिक देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सखी श्रावणी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्री नेवे, नारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहा गाजरे, साकरी ग्रामपंचायत सदस्य निर्मला कोळी, महिला बचत गट प्रमुख प्रतिभा जावळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, नेव्हीचे कॅप्टन संदीप रायभोळे, भूषण झोपे आदींची उपस्थिती होती.