जळगाव । नरेंद्र मोदी संघाचे उपजिल्हा अध्यक्ष सुनील श्रीश्रीमाळ यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देवून रुग्णाची समस्या जाणून घेतल्या. रुग्णांना भेटून त्यांच्याशी चर्चाकरीत समस्या जाणुन घेतल्या. वेळेवर औषधोपचार होत नाही, शस्त्रक्रिया होत नाही, योग्य वेळी रक्तपुरवठा करीत नाही,सिटी स्कॅन मशीन बंद, सोनोग्राफी मशीन बंद असल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारी सोडविण्यासाठी एस.पी.बेंद्रे, डी.व्ही.नाईक यांना भेटून निवेदन दिले. याप्रसंगी सुनील श्रीश्रीमाळ , मनीषा ताई जोशी , सरोजा पाठक, अनिल पगरिया, पंकज जैन, सचिन बावीसकर, कृष्णा नेमाडे, किशोर वाघ, जिनल जैन, विक्की पिपरीया आदी उपस्थित होते.