नरेंद्र मोदी संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी खंडेलवाल

0

जळगाव । भारतीय नरेंद्र मोदी संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जळगाव येथील नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय संस्कृती संवर्धन, राष्ट्रनिर्माण व नरेंद्र मोदींच्या विचारांचा प्रचार, प्रसार हे नरेंद्र मोदी संघाचे मुख्य उद्दिष्ट असून, या संघटनेच्या देशभरातील सदस्यांची संख्या 90 लाखांवर पोहोचलेली आहे. खंडेलवाल यांचे समाजसेवा, हिंदू धर्मसेवा तसेच गोरक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आलेली आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम नमो संघातर्फे राबविण्यात येतील. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाला उपयुक्त ठरतील, अशा सांस्कृतिक स्पर्धा तसेच उपक्रम नमो संघातर्फे घेतले जातील, असे खंडेवाल यांनी सांगितले.