BUS IN NARMADA RIVER अमळनेर आगाराची बस नर्मदा नदीत कोसळली : 13 प्रवासी ठार
मृतांचा आकडा वाढण्याची भीती : बहुतांशी प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी
BUS IN NARMADA RIVER इंदौर : अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस नियंत्रण सुटल्याने नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवासी ठार झाले तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवार, 18 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. दरम्यान, मयतांपैकी आतापर्यंत आठ पुरूष, चार महिला व एका बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर काही प्रवासी वाहून गेल्याची भीती आहे. बचावकार्याला गती देण्यात आली असून स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
नियंत्रण सुटल्याने बस कोसळली नदीत
आग्रा-मुंबई महामार्गावरील इंदौरपासून 80 किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. महाराष्ट्रातील अमळनेर आगाराची ही बस इंदौरहून अमळनेर येथे येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या पुलावर अपघात घडला त्या पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) तर अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये येतो. क्रेनच्या मदतीने कोसळलेली बस नदीतून बाहेर काढण्यात आली तर काही प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. अनेक मृतदेह वाहून गेल्याची भीती आहे तर स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी धावपळ केली.
अपघातापूर्वी हॉटेलवर थांबली बस
अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस (एम.एच.40 9848) ही सोमवारी सकाळी नऊ वाजता खलघाटजवळील दुध बायपासजवळ एका हॉटेलवर नास्ता करण्यासाठी थांबली होती व त्यावेळी काही प्रवाशांना नास्ताही केला मात्र त्यानंतर थोड्याच वेळात बस अनियंत्रीत झाल्याने पुलाखाली कोसळल्याने 13 प्रवासी ठार झाले तर अनेक बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
अमळनेर आगाराची अमळनेर-इंदौर बस (एम.एच.40 एन.9848) ही परतीच्या प्रवासात इंदौरहून अमळनेरकडे येत असताना खलघाटजवळ पुलावर येताच अनियंत्रीत आल्याने नर्मदा नदीत कोसळली. बसवर चालक चंद्रकांत एकनाथ पाटील तर वाहक प्रकाश श्रावण चौधरी होते. पंढरपूर येथून प्रवाशांना घेवून परतल्यानंतर ही बस इंदौरकडे रवाना करण्यात आली होती मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास नर्मदा नदीपात्रात बस कोसळल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू ओढवला तर अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
12 people dead, 15 rescued after a Maharashtra Roadways bus going from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu in Dhar district, says Madhya Pradesh minister Narottam Mishra. pic.twitter.com/h4FuW2B3Ch
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022