नर्मदा नदीपात्रात आणखी दोन मुलींचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ७ वर

0

नंदुरबार। नर्मदा नदीपात्रात आणखी दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहे. त्यामुळे बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ७ इतकी झाली आहे. मोनिका विरसिंग पावरा (वय ६), सिमर भाईदास पावरा (वय ५) राहणार तेलखेडी अशी त्यांची नावे आहेत. मकरसंक्रांती निमित्ताने नर्मदा नदीचे पूजन करण्यासाठी नर्मदा घाटातील शेकडो आदिवासी बांधव बोटीने परिक्रमा करण्याकरिता गेले होते. त्यातील एक बोट उलटून ५ जणांना जलसमाधी मिळाली आहे, तर अन्य ३७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत आणखी दोन मुली बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेतला जात आहे. आज बुधवारी त्या दोन मुलींचा मृतदेह आढळून आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.