नळ जोडणीसाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणार

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना नव्याने नळजोड अथवा जलनि:स्सारण लाईनकरिता आवश्‍यक असलेल्या आवश्‍यक कागदपत्रांची यादी व कालावधीचा माहिती फलक महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागांत झळकणार आहे. याशिवाय यासोबतच अधिकृत प्लंबरची यादी देखील मोबाईल क्रमांकासह लावली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयत्यावेळच्या या ठरावांना मान्यता देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना नळ कनेक्‍शन अथवा जलनि:स्सारण लाईन टाकण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या कामाला विलंब होतो. नागरी सुविधा केंद्रात दाखल झालेल्या अर्जांची माहिती देखील विलंबाने मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. ही बाब टाळण्याकरिता महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात नळकनेक्‍शन व जलनि:स्सारण लाईनकरिता आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांचा माहिती फलक लावला जाणार आहे.