नवजात बाळासह महिला लष्करी अधिकार्‍याने घेतले शहीद पतीचे अंत्यदर्शन

0

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : विंग कमांडर डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान असे काही घडले की, उपस्थितांच्या अश्रूंनी अभिमान आणि आदर दिसून लागला. डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांची पत्नी लष्करी अधिकारी कुमूद डोगरा या पाच दिवसांच्या नवजात बाळासोबत पोहोचल्या होत्या. बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या कुमूद यांना पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली. आसाममध्ये 15 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा मजुली आयर्लंडवर अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट शहीद झाले, त्यामध्ये विंग कमांडर दुष्यंत वत्स होते.

लष्करी गणवेशात उपस्थिती
डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा लष्करात अधिकारी आहेत. नुकतेच त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाले असून, त्यांचे बाळ फक्त पाच दिवसांचे आहे. मात्र एकीकडे गोड बातमी आली असताना त्यांच्यावर हा दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्यातून सावरत त्यांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली. पाच दिवसाच्या बाळाला कुशती घेत लष्करी गणवेशात त्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचल्या. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेजर कुमूद डोगरा यांच्या शौर्य आणि हिंमतीसाठी सर्वजण त्यांना सलाम करत आहेत.