नवज्योतसिंह सिद्धू विरोधात गुन्हा दाखल !

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप दिल्ली प्रवक्ता नवीन कुमार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दिल्ली गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तान दौऱ्यावर असतांना खालिस्तानी दहशतवाद्यासोबत फोटो काढल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान सिद्धू यांच्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अडचणीत आले आहे. त्यांच्याच सरकारमधील तीन मंत्र्यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्या विषयी मागणी केली आहे.