नवी दिल्ली – काल पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या समारंभात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमाल जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. याच मुद्यावरून भाजपने नवज्योत सिध्दूवर जोरदार टिका केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांना पक्षातून निलंबीत करावे अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन सिध्दूवर टीका केली. शपथविधीच्या समारंभात पाकव्याप्त काश्मीरचे (पीओके) अध्यक्ष मसूद खान यांच्याजवळच सिध्दू बसले होते. मात्र, यावर त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. हा काँग्रेसने केलेला मोठा गुन्हा आहे. हा वैयक्तिक गुन्हा नसून, काँग्रसेने यावर सावरावर करू नये असेही पात्रा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र, या सर्व प्रकाराबद्दल बोलण्यास नकार दिला.
याप्रकारावरून हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनीही सिध्दूवर टीका केली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन झाले आहेत. देश एकीकडे शोकात बुडालेला आहे तर, दुसरीकडे, पंजाब सरकारचे मंत्री सिद्धू पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या शपथविधी समारंभात सहभागी होत आहेत. ही लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. हा प्रकार अतिशय गंभीर असून पाहुल गांधींना याबद्दल जाब विचारला पाहिजे. याबद्दल सिध्दू यांचे निलंबन करावे अशी मागणी भाजपने केली आहे.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) August 19, 2018