भुसावळ : गणेशोत्सवाप्रमाणेच आगामी नवरात्रोत्सवातही शहरातील उपद्रवी शहराबाहेर ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे नियोजन असून त्या अनुषंगाने 68 जणांचे प्रस्ताव प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. भुसावळ शहरात व विभागात नवरात्रोत्सव शांततेत साजरा होण्याच्या दृष्टीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नियोजन केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार असून चारही पोलीस स्टेशन हद्दीतील टॉप 30 गुन्हेगारांवर त्याप्रमाणे महिलांविषयक गुन्ह्यांमधील गुन्हेगारांवर, शस्त्र अधिनियमखालील गुन्हेगारांवर, अवैध दारू विक्री करणार्या गुन्हेगारांवर वेगवेगळी कारवाई करण्यात येणार आहे. अशा रेकॉर्डवरील 68 गुन्हेगारांना नवरात्र उत्सवाचे 11 दिवस,स ीआरपीसी 144 (3) खाली 7 ते 17 ऑक्टोबरपर्यंत भुसावळ शहर व भुसावळ तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव संबंधित पोलीस स्टेशन कडून प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असल्याचे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळातही 60 पेक्षा अधिक जणांना शहरबंदी करण्यात आल्याने गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला होता. दरम्यान, भुसावळ शहर 21, बाजारपेठ 20, तालुका 11 व नशिराबाद 16 या प्रमाणे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.