चाळीसगाव : नवीनवर्षाच्या स्वागतासाठी अनेकांकडून नवनवीन पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात. तरुणाई तर 31 डिसेंबर रोजी मध्यपान करुन झिंगाट होण्याच्या तयारीत असतात. मात्र, रयत सेनेने या सर्वांव्यतीरिक्त आगळा-वेगळा कार्यक्रम करत दि.31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या पुर्वसंधेला येथील सिग्नल चौकात देशासाठी ज्यांनी बलीदान दिले, अशा सर्व शहिद जवानांना सायंकाळी 7 वाजेच्यासुमारस श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्रद्धांजली प्रसंगी यांची होती उपस्थिती
यावेळी रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, नवनिर्वाचित नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेविका विजया पवार, माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे, ज्ञानेश्वर पाटील, रा.वी.चे संचालक विश्वास चव्हाण, सुधीर पाटील, शहर वाहतुक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ, पत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, पो.पा.विनायक मांडोळे, सुजीत माळी, राकेश बोरसे, रयत सेनेचे प्रदेश संघटक पप्पु पाटील, सचिव प्रमोद वाघ, समन्वयक पी.एन.पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कोपसे, जिल्हाउपाध्यक्ष सुर्यकांत कदम, ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश पाटील, संजय कापसे, बंटी पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष दिनेश चव्हाण, कार्यध्यक्ष दिपक चव्हाण, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, शिक्षक महिला सेनेच्या तालुकाध्यक्ष जयश्री माळी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिपक राजपूत, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मयूर चौधरी, तालुका उपाध्यक्ष मुकूंद पवार, भरत नवले, सतिष पवार, बंडू पगार, मयूर चौधरी, मनोज भोसले, अजय जोशी, अनिल पाटील, शैलेश पाटील, सच्छिदानंद कुमावत, अमोल पाटील, सागर यादव, अतुल घाडगे, आबा पाटील, पवन पवार, सुरज ठाकूर, मंगेश पवार, विजय गायकवाड, जयेश पाटील, चेतन पाटील, संजय वानखेडे, वैभव नेवे, मंगेश देठे, दीपक पवार, विवेक देठे, अनिल आहिरे, संदीप पाटील, समाधान पाटील, सुनिल पाटील, निखील पवार, धीरज पवार आदिंसह रयत सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.