माथेरान । नुतन वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी माथेरानमध्ये गर्दी केलेली असून हॉटेल्स, लॉजिंग या हाऊस फूल झालेल्या आहेत. वर्षाचा शेवटचा रविवार आल्याने मांसाहारावर ताव मारण्यासाठी खवैय्यांची झुंबड बाजारपेठेच्या भागातील रेस्टॉरंट मध्ये दिसत आहे.
या वर्षातील अंतर्गत हेवेदावे विसरून नव्याने आत्मविश्वासी वृत्ती जोपासली जावी. नवीन वर्षात कुटुंबाला सुखसमृद्धी लाभावी अन् एकंदरीतच 2018 वर्ष भरभराटीचे जाण्यासाठी सर्वत्र पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. इथल्या दुकानदारांनी दुकानात भरगच्च सामान तसेच लहानमोठ्या स्टॉल्स्धारकांनीसुद्धा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वसोययुक्त वस्तु ठेवलेल्या आहेत. घोडा आणि हातरिक्षातून पॉईंटस् ची मजा लुटण्यासाठी हौशी पर्यटक आनंद घेत आहेत. चिक्की, चप्पल तसेच लेदरच्या बॅग खरेदीसाठी सायंकाळी बाजारपेठा सज्ज असून सर्वांनाच हा हंगाम धनप्राप्तीसाठी शेवटचा असल्याने जो तो आपापल्या परीने व्यवसाय करण्यात मग्न आहे.