सर्वांनी नियम पाळून प्रशासनाला करावी मदत
लोणावळा पोलिसांनी केले पर्यटकांना आवाहन
हे देखील वाचा
लोणावळा : 31 डिसेंबर हा वर्ष समाप्तीच्या दिवशी लोणावळा, तळेगाव दाभाडे परिसरातमध्ये हॉटेल्स, लॉज आदी ठिकाणी दरवर्षी मोठी गदी उसळत असते. लोणावळ्यामध्ये सरत्या वर्षाला समारोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी जमू लागली आहे. राज्यातील शाळांमध्ये नाताळची सुट्टी सुरू आहेत. त्यामुळे या सुटीचा आनंद घेण्याकरिता व थर्टी फर्स्ट, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीकरिता लोणावळा व खंडाळा शहरात पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवडाभर ती कायम राहणार आहे. त्यामुळे येणार्या पर्यटकांनी, हॉटेल्सवाल्यांनी, बारवाल्यांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन लोणावळा पोलिसांमार्फत नुकतेच करण्यात आले होते.
अवैध दारूविक्री सुरू
लोणावळ्यामध्ये बेकायदा दारू आणि हुक्का विक्री केली जात आहे. लायन्स पॉईंट परिसरात सायंकाळी सातनंतर पर्यटकांकरिता बंद ठेवलेले आहे. पॉइंटचे दोन्ही गेट बंद केले जातात. एवढी काळजी घेवूनही काही युवक हे रस्त्याकडेला उभे राहत रात्रीच्या वेळी येणार्या पर्यटकांच्या वाहनांना थांबवून दारू, हुक्का हवाय का, असे विचारताना दिसतात. छुप्या पद्धतीने ही हुक्काविक्री करीत आहेत. राज्यात हुक्काबंदी करण्यात आल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी अनेकवेळा या ठिकाणी अचानक छापा टाकत हुक्का व हुक्क्याची भांडी दरीत फेकून दिली आहेत. त्यानंतर या परिसरातील खुलेआम हुक्काविक्री बंद झाली असली, तरी काही मंडळी आजही छुप्या पद्धतीने हुक्काविक्री करीत आहेत.