चिंचवड – वाल्हेकरवाडी परिसरातील एका 24 वर्षीय नवविवाहित तरुणाने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शनिवारी) पहाटे वाल्हेकरवाडी येथे उघडकीस आली. रमेश उत्तम करकरो (वय 24, रा. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश हा पेंटिंगचे काम करीत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास रमेश याने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला उपाचारासाठी त्वरित पिंपरीतील ‘वायसीएमएच’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.