नवसाचा कार्यक्रम सांगून महिलेच्या घरातून सिलिंडर लांबवले : दुकलीविरोधात गुन्हा

Thieves extended gas station from Jalchakra village : Crime against two बोदवड : तालुक्यातील जलचक्र गावातून दोघा चोरट्यांनी तीन हजार रुपये किंमतीची भरलेली गॅसची हंडी लांबवली. ही धक्कादायक घटना 20 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
कुसूमबाई किसन गोसावी (62, जलचक्र खुर्द, ता.बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी राजू दीपा कोळी व सोनी आकाश कोळी (चारडाणा, ता.मुक्ताईनगर) यांनी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गोसावी यांच्या घरातील गॅस हंडी नवसाचा कार्यक्रम असल्याचे सांगून नेली मात्र परत न केल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.