लाहोर: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम (वय ६८) यांचे आज लंडनमध्ये निधन झाले. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या.
कुलसुम नवाज यांच्यावर लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये जुलै २०१४ पासून उपचार सुरू होते. सोमवारपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. कुलसुम नवाज यांचा एप्रिल १९७१ मध्ये नवाज शरीफ यांच्याशी विवाह झाला होता.