नवापुरला ट्रॅक्टरची सायकलला धड़क, विद्यार्थी जखमी

0

ट्रॅक्टरच्या चाकात आली सायकल
नवापूर :
शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ट्रॅक्टरची सायकलला धड़क होऊन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टर जर वेगाने आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात होताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच धाव घेतली.

शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. जवळील गुजराती आणि मराठी माध्यमाच्या शाळा असल्याने विद्यार्थ्यांची लगबग सुरु असते. सकाळी बारा वाजेच्या सुमारास खड़ी भरलेल्या ट्रॅक्टरने सायकल स्वार विद्यार्थ्यांला धड़क दिली. सायकलचे पुढील चाक ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अकरा वर्षीय विद्यार्थी खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.

शहरातील जगदीश टेलर यांचा मुलगा पुलंकित हिंगुला परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी नवापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. महात्मा गांधी चौकात वाहने व विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ राहत असल्याने नियमित वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासनाने महात्मा गांधी चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.