नवापुरातील नुकसानीची जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

0

नवापूर प्रतिनिधी । नवापूर तालुक्यात झालेल्या महापूराची संपुर्ण माहिती जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कल्लशेटी यांनी घेतली. आज दिवसभर ते तालुक्यात होते.

जिल्हाधिकारी कल्लशेटी यांनी बोकलझर गावात झालेल्या प्रचंड प्रमाणातील नुकसानीची पाहणी केली. बोकलझर गावाची माहिती सरपंच राहुल गावीत यांनी दिली. जामतलाव ते बोकलझर गावाचा पुलाचा भराव वाहुन खड्डा पडला आहे. तसेच रात्री ११ वाजेचा दरम्यान रंगावली डँम फुटल्याची अफवा होती.त्यांची पाहणी करुन खात्री केली.धरणाचा थोडा भरवा वाहुन गेल्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. रेटीयो तुवरताळ या मिल मध्ये पाणी घुसुन ५ फुट भित तुटल्याने गोडाऊन मध्ये पुराचे पाणी गेल्याने गोडाऊन मधील तुवरताळ,मका,वटाना,भात,पेकींग पाकीटचे मोठे नुकसान झाले तसेच मिलचा परीसरात अन्य गोडाऊन मध्ये पाणी घुसुन पक्षीखाद्याचा जवळ जवळ २ पोत्याचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे ताळमिलचे ५० लाखाचे नुकसान झाले असुन येथील कामगार वर्ग व मालक चिंतीत आहे.तसेच आज जिल्हाधिकारी मल्लीनाथ कल्लशेटी यांनी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी याची बैठक घेतली व त्यांना नुकसान झालेल्या गावाचा पंचनामा करुन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी प्रांत अधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार राजेंद्र नजन,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत,सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.