नवापुर। आषाढी एकादशी म्हटले तर विठ्ठल आणि सुखमाई यांची पंढरपुर येथे याञा असते. त्यात वारकरी अती आनंदाने दिंडी घेऊन जातात तसेच नवापुर शहरातील आदिवासी महिला मंडळ संचलित एकलव्य बालवाडी व स्व.केशवराव गावीत बालवाडी या संस्थेच्या दोन्ही बालवाडी मिळुन विठ्ठल रुखमाईची विद्यार्थ्यांनी वेशभुषा परीधान करुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यात विद्यार्थी घोषणा देत जात होते.झाडे लावा ,झाडे जगवा.एक मुल-एक झाड अशा घोषणाबाजी करत गावात प्रभातफेरी काढण्यात आली.त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
विठ्ठल-रुखमाईच्या वेशात असलेल्या विद्यार्थ्यांचे पुजन
स्व.केशवराव बालवाडीत नवापुर या स्तुत्य उपक्रमात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेणुका गावीत यांनी उपस्थित देऊन विठ्ठल व रुखमाईच्या वेषभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे आरती ओवाळुन पुजा केली व या बालगोपालांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मीना गावीत, उपाध्यक्ष उषा मावची, दक्षा पाटील, हेमा गावीत, अमिता गावीत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. यावेळी नागरीकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करुन स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.