नवापुरात गुणवंतांचा सत्कार ; विद्यार्थ्यांचे शाळेबद्दल ऋणनिर्देश

0

नवापूर । येथील श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इ.दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद वाघ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक डी.बी. बेंद्रे, पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, वरिष्ठ शिक्षक संजीवकुमार पाटील, ए. बी. थोरात, एस.डी. सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधून काजल मराठे हीने सर्व शिक्षकांचे आभार मानत आजचा सन्मान उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. यावेळी पालकांमधून दीपक मंडलिक, प्रल्हादसिंग राजपूत, नारायण मराठे, चंद्रकांत साकाळकर, संजय पाटकर, नितीन माळी उपस्थित होते. या प्रसंगी गणेश महाजन व योगिता पाटील यांनी यांच्या वडीलांप्रित्यर्थ रोख रक्कम व दप्तर देऊन गुणवंत विध्यार्त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक डी. बी. बेंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन भरत सैंदाने यांनी तर आभार एस. डी. शिरसाठ यांनी मानले.

सन्मान उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी
दहावीतील गुणवान विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिहीर मंडलिक, द्वितीय हितेश माळी, अध्यक्षीय भाषणातून मिलिंद वाघ यांनी गुणवान विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांप्रमाणेच आपली काळजी घेऊन बहरावे तसेच आपला आजचा सन्मान आयुष्यभर काहीतरी चांगले करण्याचे बळ निर्माण करणारा ठरावा असे सांगुन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दहावीतील यशस्वी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्य, दप्तर व सन्मानपत्र देऊन पालकांसंवेत गौरविण्यात आले.तृतीय पवन राजपूत तर इ. बारावीच्या सायन्स शाखेतील यशस्वी विद्यार्थांमध्ये प्रथम क्रमांक कु. काजल मराठे,द्वितीय मनिष साकाळकर, तृतीय काजोल पाटकर तर कलाशाखेतील प्रथम लक्ष्मी गावित, द्वितीय प्रतिमा वसावे, तर तृतीय नशिबा कोकणी व इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हयात तिसरा येणार्‍या अनिकेत माळी याचाही सन्मान करण्यात आला.