नवापूर। शहरातील महात्मा गांधी पुस्तकालयात तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, वाघ यांनी वार्षिक अहवाल ग्रंथालय कामकाजासह इतर बाबी बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रंथालयाच्या प्रगतीसाठी व गावोगावी ग्रंथालयाबाबत जनजागृतीसाठी उपस्थित कर्मचार्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमास महात्मा गांधी पुस्तकालय पदाधिकारी एन.जी. जोशी, राजेंद्र साळुंखे, दर्शन अग्रवाल, डॉ.आनंद वशिष्ठ तसेच तालुक्यातील करंजी बु, मौलीपाडा, वागदी, वडकळबी, बंधारपाडा, भरडु, घोघळपाडा, केळी, येथील ग्रंथालय कर्मचारी यांची उपस्थिती होते. सुत्रसंचलन व आभार राजेंद्र साळुंखे यांनी केले.